शिक्षण व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासह राज्यातील चार मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर

रायगड माझा वृत्त 

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासह राज्यातील चार मतदारसंघांत 8 जून रोजी होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. या निवडणुकीची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कपिल पाटील व ऍड. निरंजन डावखरे यांनी आयोगाला तातडीने पत्र पाठविले होते.

सुटीनिमित्ताने शिक्षक व पदवीधर मतदार गावी गेले असल्यामुळे निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी आमदार पाटील व आमदार डावखरे यांनी केली होती. 15 जून रोजी शाळा सुरू होणार असल्यामुळे नियोजन करून शिक्षक व पदवीधरांनी प्रवासाचे आरक्षण केले होते. ऐनवेळी आरक्षण बदलण्यास अडचणी येणार होत्या. ही बाब लक्षात घेऊन कपिल पाटील व कोकण पदवीधर मतदारसंघाचे ऍड्‌. निरंजन डावखरे यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्राची दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील चार मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत