शिर्डीत सेवा निवृत्त जवानाचा गोळीबार; गुन्हा दाखल

शिर्डी : रायगड माझा वृत्त 

मध्यप्रदेशातील रहिवाशी असलेला पुष्पराज रामप्रसाद सिंग या सेवानिवृत्त लष्करी जवनाने शिर्डीत येऊन हवेत गोळीबार केल्याने काही काळ घबराट निर्माण झाली. नवीन कार खरेदी केल्याच्या आनंदातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान,गोळीबार करणाऱ्या या जवानाविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पकडले आहे. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली.

लष्करातून सेवा निवृत्त झालेल्या रामप्रसाद सिंग (वय ३८ )या जवानाने नवी कोरी कार खरेदी केली असून तो भाऊ व मित्रासोबत साई दर्शनास बुधवारी संध्याकाळी शिर्डीत आला होता. त्यांनी साई मंदिराच्या जवळ पालखी रोड वर हॉटेल कौशल्या येथे खोली बुक केली होती. साईबाबांचे दर्शन आटोपून त्यांनी नव्या कारची पूजा केली. रात्रीचे जेवण आटोपून ते सर्वजण हॉटेलवर परतले. हॉटेल परिसरात कार उभी करून या जवणाने सोबत आणलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला आणि कार खरेदीचा आनंद साजरा केला.

गोळीबाराचा आवाज झाल्याने हॉटेल व सभोतालचा परिसर हादरला. आणि एकच घबराट माजली. पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले.पोलिसांनी या जवनास पकडले व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोळीबार का केला असे पोलिसांनी त्याला विचारल्यावर नवीन गाडी खरेदी केल्याचा आनंद साजरा केला असे सांगितले अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी दिली.पोलीस उपाधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनीही या घटनेची गंभीर नोंद घेत सखोल तपासाचे आदेश दिले आहेत .या जवनाकडे असलेली बंदूक ही परवानाधारक आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत