शिल्पा शेट्टीला ऑस्ट्रेलियाच्या सिड्नी विमानतळावर पुन्हा आला वर्णभेदाचा वाईट अनुभव

रायगड माझा ऑनलाईन ।

शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ऑस्ट्रेलियाच्या सिड्नी विमानतळावर वर्णभेदाचा वाईट अनुभव आला. शिल्पा कँटास एअरलाइनच्या बिझनेस क्लासनं प्रवास करत होती. मर्यादेच्या आतच तिचं सामान होतं. पण तरीही कँटासची एक कर्मचारी तिची अडवणूक करत होती. तू असं का करतेस, असं शिल्पानं तिला विचारलं. त्यावर तुमच्यासारख्यांशी असं वागलेलं चालतं असं उत्तर त्या एअरलाइन कर्मचाऱ्यानं दिलं. शिल्पानं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून तिचा राग व्यक्त केला.

https://www.instagram.com/p/BoDOpZLhxBH/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला. यात तिची बॅगही दिसत आहे. शिल्पाने लिहिले की, तिच्या बॅगेचं वजन नियमांमध्ये बसणारे असतानाही जबरदस्ती तिची बॅग लगेजमध्ये टाकण्यात आली. म्हणून शिल्पाने बॅगसह फोटो शेअर करत चाहत्यांनाच ही बॅग खरंच एवढी जड आणि मोठी आहे का? असा प्रश्न विचारला. याआधीही २००७ मध्ये बिग ब्रदर या रिअलिटि शोमध्ये वर्णभेदाची शिल्पा शिकार झाली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत