शिवआरोग्य सेवेचा फिरता दवाखाना म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड गावात दाखल

म्हसळा : निकेश कोकचा

शिवसेना नेते तथा केंद्रिय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते यांच्या संकल्पनेतून साकार झालेला शिव आरोग्य फिरता दवाखाना सोमवार दिनांक ३० जुलै रोजी म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड गावामध्ये दाखल झाला. या फिरत्या दवाखान्याचा गावातील व परिसरातील अनेक रूग्णांनी लाभ घेतला.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आरोग्य खर्चामुळे ग्रामिण भागातील नागरिकांची आर्थिक हिरमोड होत असतानाच शिव आरोग्य सेवेमार्फत अशा रुग्णांची तज्ञ डॉक्टरांमार्फत  मोफत तपासणी व मोफत औषध वाटपामुळे त्याना काहीसा दिलासा मिळाला आहे. शिव आरोग्य सेवेच्या स्वागतासाठी  शिवसेनेचे  श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक श्री.रविंद्रजी लाड, डॉक्टर श्री.सूबोध पडवल, श्रीमती राऊत, फारमासिक श्री.निखील देसाई,श्री.अभिजीत , अवजड वाहतूक सेनेचे श्री.श्याम कांबळे, श्री.दिपल शिर्के, श्री.जूबेदभाई ,मेंदडी कोंड ग्रामस्थ, मोठ्या प्रमाणात तपासणीसाठी आलेले रुग्ण व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
शिव आरोग्य सेवेचा लाभ  तळागाळातील गरजु लोकांना निरंतर सुरु रहावा  यासाठी प्रत्येक महिन्यात दोन ते तिन वेळा ही फिरती आरोग्य गाडी म्हसळा तालुकयात आणण्याचा प्रयत्न करीन;
-रविंद्र लाड, क्षेत्र संघटक श्रीवर्धन विधानसभा
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत