शिवनेरीवर मद्यपान, पाच वनकर्मचारी अटकेत

(रायगड माझा ऑनलाईन)

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीच्या मंदिर परिसरात वनविभागाचे कर्मचारी मद्यपान करीत असल्याचे उघडकीस आले असून त्या पाचजणांना जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे.

चैतन्य कांबळे, शशिकांत मडके, प्रशांत जाधव, संतोष नवगिरे, प्रकाश मोधे अशी अटक केलेल्या पाचजणांची नावे आहेत. याप्रकरणी दत्तात्रय एकनाथ फापळे यांनी फिर्याद दिली आहे. शिवजयंतीनिमित्त सातारा जिह्यातील सातारा कोरेगाव येथील शिवप्रेमी शिवज्योत नेण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर आले होते. यावेळी शिवाई देवीच्या मंदिराजवळ हे पाच कर्मचारी मद्यपान करीत असल्याचे त्यांनी पाहिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत