शिवनेरी किल्ल्यावर रंगला जन्मोत्सव सोहळा, फडणवीस यांची हजेरी

(रायगड माझा ऑनलाईन टीम )

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभऱ उत्साहात साजरी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन केले. त्यावेळी उपस्थित हजारो महिला व समुदायासह त्यांनी पाळणा हलवला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबईत विमानतळावर छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.

दिल्लीत खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवजयंतीचा जंगी कार्यक्रम आयोजित केला आहे. दिल्लीतील कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. यासाठी दोन हजार कलाकार राजधानीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम होईल. यानंतर राजपथावरून भव्य मिरवणूक निघणार आहे. यात हत्ती घोडे आणि ऊंटही पाहायला मिळतील. मागील महिन्यात पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये याच चमूने सहभाग घेत देशात पहिला क्रमांक पटकावला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत