शिवशंभो प्रतिष्ठान मार्फत गोवे येथे वृक्ष लागवड !

कोलाड : कल्पेश पवार

रोहे तालुक्यातील गोवे येथे नुकतेच श्री शिवशंभो प्रतिष्ठान मंडलातील युवकांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड केली आहे.प्रचंड प्रमाणात करण्यास आलेली जंगलतोड व अन्य कारणामुळे वृक्षांची संख्या रोडावत चालली आहे.त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शासनाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. त्या उद्देशानेच तालुक्यातील गोवे येथील तरूणांनी एकत्र येऊन गावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला.

तरूणांच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम कोलाड येथील श्रीमती गीता द तटकरे तंत्रनिकेतन या विद्यालय मार्फत गोवे येथील शिवशंभो प्रतिष्ठान मंडलातील युवकांना विविध प्रजातीची शेकडो रोपे उपलब्ध करून दिले.

त्यामुळे मंडल अध्यक्ष लीलाधर दहीबेकर ,उपाध्यक्ष किरण पवार,सेक्रेटरी शुभास पवार,हरेश गुजर,खजिनदार निलेश कोंजे, सतीश दिघे,सल्लागार ,विजय पवार, या पदाधिकाऱ्यांसह सर्व सद्स्य यांनी एकत्र येऊन गोवे परिसरात झाडे लावून वृक्षारोपण केले व त्यांना वाढवण्याचा संकल्प केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत