शिवशाही बस आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात एकजण ठार तर दुसरा गंभीर जखमी

औसा : रायगड माझा वृत्त 

औसा तालूक्यातील चलबुर्गा पाटीजवळ राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. तानाजी श्रीपती कांबळे (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर लक्ष्मण काशीनाथ ताकनाटे (३५) असे जखमीचे नाव आहे.

२५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई – हैद्राबाद बस क्र.एमएच १४ डी ८४४६ ची मोटारसायकल क्र.केए ५६ ई ७६०४ ला धडक बसल्याने तानाजी हा जागीच ठार झाला. तर मोटारसायकलवरील लक्ष्मण हा गंभीर जखमी झाल्याने त्यास लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील वर्षभरात चलबुर्गा पाटीनजिकचा हा चौथा अपघात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत