शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देऊळवाडीतील युवासैनिकांचा सामाजिक उपक्रम.

कर्जत-भूषण प्रधान

कर्जत तालुक्यातील देऊळवाडी या गावात 23 जानेवारी बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त युवासेनेचे कर्जत उपतालुका अधिकारी श्री संदीप बडेकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

         
यावेळी संदीप बडेकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर आणि युवासैनिकानीं बाळासाहेबांविषयी आपले विचार व्यक्त केले.
संदीप बडेकर यांनी या ठिकाणी किरविली ग्रामपंचायत हद्दीतील विविध शाळांमध्ये शाळेय विद्यार्थ्यांना मोफत खाऊ वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला.
तसेच बाळासाहेबांच्या जयंतीचे अवचित्य साधून देऊळवाडी (डी-मार्ट ) ते कर्जत असा एक दिवशीय मोफत रिक्षा प्रवास नागरिकांसाठी ठेवल्याचे संदीप बडेकर यांनी सांगितले.

या वेळी उपस्थित संदीप बडेकर(युवासेना उपतालुका अधीकारी),संपत हडप, गजानन बडेकर,निखिल पन्हाळे,प्रमोद पन्हाळे,रोहित तुरडे,सागर बडेकर ,सुधीर बडेकर,सतीश बोराडे,प्रशांत धर्माधिकारी,सुशांत परब,लघु घाडगे ,दीपक आग्रे,सुनील बडेकर,पप्पू बडेकर, शैलेश बडेकर आदी मान्यवर ,तसेच ग्रामस्थ आणि शाळेय शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.

           

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत