शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी पोहचले ईडीचं पथक

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीची टीम पोहचली आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी ८ वाजता पोहचले. मुंबई, ठाणे परिसरात एकूण १० ठिकाणी शोध सुरु आहे.

दरम्यान नक्की कोणत्या कारणासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र टॉप सिक्युरिटीच्या संदर्भातील हे प्रकरण असल्याची माहिती आहे. सध्या प्रताप सरनाईक हे देशाबाहेर आहेत.

अर्णब गोस्वामी, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि कंगन रनौत या प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी आणि शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत