शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या खोलीत सापडला मृतदेह

नागपूर : रायगड माझा वृत्त 

आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना नागपुरात घडली आहे. विनोद अग्रवाल (वय 50 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या नावावर ही रुम आहे.दुसऱ्या क्रमांकाच्या विंगमधील 46 क्रमांकाच्या रुममध्ये विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या खोलीत सापडला मृतदेह

सकाळी बराच वेळ दार वाजवूनही विनोद अग्रवाल यांनी रुमचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर लॉक तोडून आत प्रवेश केल्यानंतर ही घटना लक्षात आली.विनोद अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, विनोद अग्रवाल आमदारांचे सहायक यांचे परिचयाचे असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेबद्दल अजून नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचं कारण समोर येईल.पावसाळी अधिवेशन यंदा पहिल्यांदाच नागपुरात होत आहे. सर्व आमदार उद्यापासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. 4 जुलै ते 20 जुलै या काळात हे अधिवेशन चालणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत