शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज ; उद्या लोणावळ्यात प्रमुख  कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण 

पिंपरी : रायगड माझा

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी शिवसेनेने आतापासूनच सुरु केली आहे. त्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर येत्या शुक्रवारी लोणावळा येथे आयोजित केले आहे. यातून 2019साठी बारणे यांची उमेदवारी निश्चीत झाल्याचे मानले जात आहे.

यानिमित्त घाटावरील आणि घाटाखालील शिवसेना पदाधिकाऱ्यांची मांदियाळी लोणावळ्यात होणार आहे. शिबिराचे उदघाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. समारोप जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमदार मनोहर भोईर, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, रायगड जिल्हा महिला संघटीका सौ. रेखाताई ठाकरे, रायगड जिल्हा महिलासंपर्क प्रमुख सौ. किशोरी पेंडणेकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे वक्ते शशांक मोहिते, दीपक शेडे, नितीन बानगुडे-पाटील हे प्रमुख वक्ते राहणार आहेत. मोहिते प्रशिक्षण शिबिर, शेडे निवडणुक व बुथ व्यवस्थापन, तर शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे ‘मी भगवा फडकवणारच’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत