शिवसेना पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शिवसेनेतील ईशान्य मुंबईमधला पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरु सुरु होते. याच वादातून माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख असलेल्या दत्ता दळवी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला.

दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जगदीश शेट्टी यांचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासोबत चांगले संबंध असल्यानं शेट्टींना शिवसेनेतून हाकलल्याचं म्हटलं जातं. शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे त्यांनाही पक्षातून काढण्यात आलं. अनेक वर्षानंतर शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत