शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, भाजपनं शिवसेनेसाठी पालघरची जागाही सोडली

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभेसाठी 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं समोर येत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनाला 23 आणि भाजपला 25 जागा असा फॉर्म्युला ठरल्याचं समोर येतंय. तसेच भाजपने मित्रपक्ष शिवसेना अडून बसलेल्या पालघरच्या जागेवरही पाणी सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.याशिवाय विधानसभेच्या जागावाटपावरही बोलणी झाल्याचं समोर आलं आहे.

विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचं कळत आहे. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत. येत्या 2-3 दिवसांत भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. भाजप युतीसाठी आग्रही आहे. मात्र शिवसेनेने गेल्या काही महिन्यापासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांची सोडली नाही.युतीबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंपासून सर्वच शिवसेना नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला. मात्र भाजप नेत्यांनीही युती होणार असा विश्वास वारंवार व्यक्त केला होता. त्यामुळे येत्या काही दिवसात युतीची घोषणा झाली तर या युतीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत