शिवसेना – युवासेनेच्या दणक्याने रुबी मिल्स व्यवस्थापनाने घेतली नरमाईची भुमीका; आमदार महेंद्र थोरवेंच्या प्रयत्नांना यश

खालापूर : समाधान दिसले (प्रतिनिधी)

खालापूर तालुक्याला औद्योगिक वसाहतीचे माहेरघर म्हटलं जातं. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे असंख्य प्रकारचे कारखाने असून अनेकांना या कारखान्याच्या जोरावर रोजनदारी मिळत आहे. परंतु काही निवडक कारखानदार व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करीत असल्याने कामगारांमध्ये त्या – त्या कारखानदार व्यवस्थापनाबाबत नाराजीचा सूड उमटत असतो. कामगार आपल्याला न्याय मिळावा म्हणून अनेक प्रकारचे आंदोलन छेडत असतात, मात्र काही कारखानदार आपला मुजोरपणा कायम ठेवत कामगारांवर दडपशाही लादत आहेत. अशीच तालुक्यातील खरसुंडी येथील दि.रुबी मिल्स व्यवस्थापन कामगारांची असंख्य प्रकारची पिळवणूक करीत स्थानिक कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देत कामगारांना कामापासुन वंचित ठेवणे, महिला भगिनीवर अन्याय करणे तसेच स्थानिक शेतकरी यांची जमीन लाटणे यासहीत स्थानिक ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारी कंपनी व्यवस्थापनाबाबत येत असल्याने या मुजोर व्यवस्थापनाला वठणीवर आणण्यासाठी खालापुर तालुका शिवसेना – युवासेना आक्रमक झाली होती. त्या अनुषंगाने आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खालापुर तालुका शिवसेना – युवासेनेने 1 डिसेंबर रोजी भव्य आंदोलनाचे इशारा रुबी कंपनीला व्यवस्थापनाला दिल्याने या इशाराने रुबी कंपनी व्यवस्थापन नरमल्याने शिवसेना – युवासेनेच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असून त्या आशयांची बैठक खालापूर तहसिल कार्यालयात कंपनी व्यवस्थापनाबरोबर आमदार महेंद्रशेठ थोरवे व शिवसेना – युवासेना पदाधिकारी वर्ग उपस्थितीत पार पडली आहे. तर कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतल्याने 1 डिसेंबर रोजीचे भव्य आंदोलनाला स्थगिती मिळाल्याने महिला आघाडी, शिवसैनिक – युवासैनिकांत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

या बैठकीला आमदार महेंद्रशेठ थोरवे, खालापुर तहसिलदार इरेश चप्पलवार, डि.वाय.एस.पी संजय शुक्ला, खालापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते, कामगार उपायुक्त पवार, कंपनी व्यवस्थापनाचे भरतभाई शहा, कुचल, शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, समन्वयक एकनाथ पिंगळे, प्रवक्ते सुरेश देशमुख,माजी तालुकाप्रमुख उमेश गावंड, सुरेश कडव, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, जि.प.सदस्य मोतिराम ठोंबरे, पं.स.सदस्य उत्तम परबळकर, खालापुर शहरप्रमुख पदमाकर पाटील, दिपक मालुसरे, एस.एम.पाटील, निवृत्ती सालेकर, दिंगबर सालेकर, अशोक मराजगे, सुरेश पाटील, प्रभाकर बारस्कर, रोहिदास पिंगळे, संतोष बामणे, सरपंच चंदन भारती, शाखाप्रमुख विष्णू ठोंबरे, कामगार प्रतिनिधी रोहीत विचारे, प्रभाकर भोसले महिला तालुका संघटिका रेश्मा आंग्रे आदीसह शिवसैनिक – युवासैनिक, महिला आघाडी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत