शिवसेना रायगड जिल्हाप्रमुखपदी किशोर जैन

पाली : विनोद भोईर

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यानी अचानक तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रायगड जिल्हा प्रमुख पदाची जागा रिक्त झाली होती. त्याच्या  जागी आता नव्याने रायगड जिल्हा प्रमुख पदी रा.जि.प. सदस्य तथा रायगड जिल्हा सल्लागार किशोरभाई जैन यांची जिल्हा प्रमुखपदी निवडीची घोषणा शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विलास चावरे यांनी पाली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे चावरे यांनी सागितले. पक्षाचे काम सतत चालू राहावे आणि पक्षातील लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी यांनी पक्षाचा जो कारभार आहे अशा रीतीने सुरू राहावे. म्हणून रायगड जिल्हा प्रमुख पदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

किशोर भाई हे या विभागाकरिता नवीन नाहीत, ते या विभागाच्या रायगड जिल्हा सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. आणि या विभागात स्वतः राहतात त्यांची ओळख कडवट शिवसैनिक म्हणून आहे, म्हमूनच त्यांची रायगड जिल्हा प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे. असे पत्रकार परिषदेत बोलतानां  विलास चावरे यांनी स्पष्ट केले.

त्याप्रसंगी रा.जि.पचे विरोधीपक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे  रा.जि. प. सदस्य किशोरभाई,  रा.जि.प.सदस्य रवींद्र देशमुख उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, उपतालुकाप्रमुख सचिन जवके ,पाली शहर प्रमुख प्रमोद खोडागळे, संदीप दपके, निलेश अवसारे,सुनील झुंजारराव ,शरद चोरगे, मनोहर देशमुख, दिनेश चिले ,संदीप खरीवले ,विद्येश आचार्य, राजेंद्र खरीवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रायगड जिल्हा प्रमुख पदाची नियुक्ती झाल्यानंतर किशोरभाई जैन पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी टाकली आहे ती मी स्वीकारली आहे . हा निर्णय दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाला त्यावेळेस ना. खासदार केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते यांच्याबरोबर बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आले पक्षाचे काम सतत चालू राहावे आणि पक्षातील लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी यांनी पक्षाचा जो कारभार आहे अशा रीतीने सुरू राहावे. म्हणून रायगड जिल्हा प्रमुख पदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर भाई हे या विभागाकरिता नवीन नाही आहेत. ते या विभागाच्या रायगड जिल्हा सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. आणि या विभागात स्वतः राहतात त्यांची खाती कडवट शिवसैनिक म्हणून त्यांना रायगड जिल्हा प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे. असे पत्रकारांना बोलतान- विलास चावरे  रायगड जिल्हा संपर्कप्रमुख यांनी सागितले. यावेळी तालुक्यातील  विभागप्रमुख किशोर दिघे, वसंत पालकर, राजा खरीवेले, शरद बोडके उमेश तांबट ,मिलंद देशमुख आदी शिवसैनिक मोठ्या संखेनी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत