नवी दिल्ली : रायगड माझा
पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. मात्र ते केंद्रातील मोदी सरकार किंवा महाराष्ट्र सरकार यांचा पाठिंबा काढून घेण्याची तूर्त तरी शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर आचारसंहिता जारी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महापालिका बरखास्त करून तिथे प्रशासक नियुक्ती करणे आचारसंहितेमुळे शक्य होणार नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे हे राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. निकटवर्ती सूत्रांची अशी माहिती आहे.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेची दीर्घकाळ सत्ता आहे. ती शिवसेनेची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेताना, मुंबईचा विचार करूनच घेतला जाईल, असे या निकटवर्ती सूत्रांचे म्हणणे असले तरी काहींना हे फक्त दबाव तंत्र असल्याचे वाटते .