शिवसेना स्वबळावरच लढेल; अमित शहा- उद्धव भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : रायगड माझा

अमित शहा यांचा अजेंडा काय आहे याची आम्हाला कल्पना आहे. मात्र, शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केला आहे. एका पक्षाचा ठराव दुसरा पक्ष ठरवू शकत नाही आणि त्यात आता कोणताही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर व तब्बल दोन तास बंद दाराआड खलबते झाल्यानंतरही शिवसेनेच्या नेत्यांकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया असल्याने ती महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी रात्री मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ही भेट तब्बल दोन तास 20 मिनिटे चालली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीदरम्यान अमित शहा आणि उद्धव यांची बंद दाराआडही बराच वेळ चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना व भाजपने फारसे बोलणे टाळले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत