शिवसेनेचा विमा कंपन्यांच्या विरोधात एल्गार; 17 जुलैला शिवसेनचा इशारा मोर्चा

रायगड माझा वृत्त 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविम्यासाठी विमा कंपन्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. शिवसेना येत्या 17 जुलैला विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढणार आहे. सर्व विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचा इशारा मोर्चा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हा मोर्चा शेतकरी मोर्चा नसेल, तर शेतकऱ्यांसाठी मोर्चा असेल. शिवसेनेचा हा इशारा मोर्चा आहे. जर इशारा देऊनही झालं नाही तर आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्राकडे स्वतंत्र कृषी स्थापन करण्याची मागणी केल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. आमचे मुद्दे भाजपनेही स्वीकारले आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि पंतप्रधान विमा योजना यावर चर्चा झाली. पीक विमा आणि कर्जमाफी या चांगल्या योजना आहेत. सरकार बदललं मात्र यंत्रणा तीच असल्यामुळे योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत