शिवसेनेची काँग्रेसच्या २ माजी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका; महाविकास आघाडीत जुंपणार..?

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकारही स्थापन केलं आहे. मात्र पहिल्यांदाच एकत्र आलेल्या या तीन पक्षांना सरकार टिकवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून नेत्यांमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही. अशातच आज ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं थेट काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाच लक्ष्य केलं आहे.

‘महाराष्ट्राच्या राजकारणात आता ताजेतवाने चेहरे यावेत अशी अपेक्षा आहे. मुरलेला मोरंबा व लोणची जेवणात बरी, म्हातारे नवरेही गमतीलाच बरे अशी लोकभावना आहे, पण तरुणांसाठी खुर्च्या सोडायला जुने तयार नाहीत. आपण नसलो तर महाराष्ट्राचे किंवा सरकारचे अडेल या भ्रमातून या महामंडळींनी बाहेर पडले पाहिजे. श्री. फडणवीस गेले. त्यांच्यामुळेही ना राज्याचे अडले ना मंत्रालयाचे अडले. जगरहाटी सुरूच असते. सरकारमधील इतर खातीही महत्त्वाचीच असतात, पण ‘मलईदार’ किंवा ‘वजनदार’ खाती हवीत अशी एक भावना काही वर्षांपासून बळावत चालली आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे आहे. मलईदार समजल्या जाणाऱ्या खात्यातून देशाची किंवा जनतेची सेवा करता येते असे ज्यांना वाटते त्यांची नियत साफ नाही, असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत