शिवसेनेची टीका बिनबुडाची; भोरची जनता सुज्ञ

नगराध्यक्ष तानाजी तारु व उपनगराध्यक्ष देविदास गायकवाड यांनी व्यक्त केला विश्‍वास

भोर: रायगड माझा 

भोर शहरात आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नांतून आणि मार्गदर्शनाखाली सुमारे 62 कोटींची विकास कामे करुन भोर शहरातील जनते समोर एक आदर्श उभा केला आहे. आम्ही वचनपूर्तीच नव्हे तर कर्तव्य पुर्तीही केली असून एके काळी राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले असलेले व आजचे शिवसेनेचे तालुका युवक प्रमुख भोर नगर पालिकेवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मात्र, भोरची जनता सुज्ञ असून चुकीच्या टिकेला भिक घालणार नाही, असा विश्वास भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तानाची तारु व उपनगराध्यक्ष देविदास गायकवाड यांनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भोर शहर शिवसेना प्रमुख भालचंद्र मळेकर यांनी वचनपूर्ती मेळाव्यात कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भोर शहरातील शिवसेनेचे अस्तित्व कमी झाल्याने नैराशेतून वाचाळ टिका होत असल्याचे नगराध्य व उपनगराध्यक्ष यांनी सांगितले. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय विरोधक कसे काय घेऊ शकतात? जिल्हाधिकाऱ्यांनी विरोधकाचे नगरसेवक पद रद्द केले, त्या मागिल गौडबंगाल काय आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यांचा आता तोल सुटला असून ते आता नाहक बिनबुडाचे आरोप करुन जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नगराध्यक्ष तारु व उपनगराध्यक्ष देविदास गायकवाड यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका ऍड. जयश्री शिंदे, नगरसेविका विजयालक्ष्मी पाठक, नगरसेवक संजय जगताप, बंडूशेठ गुजराथी, गजानन दानवले आदी उपस्थित होते.

निवडणूक जवळ आल्याने…
भोर नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सवंग लोकप्रियता मिळवण्याचा खटाटोप शिवसेना करीत असून त्यांचे सारे मनसुबे भोरची जनता उधळवून लावल्या शिवाय रहाणार नाही, असा विश्वास व्यक्त करुन आमदार संग्राम थोपटे यांच्यावर प्रेम करणारी भोरची जनता शिवसेचे डिपॉझिट जप्त करण्याची वेळ आणेल, असा टोला नगराध्यक्ष व उप नगराध्यक्षांनी लगावला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत