शिवसेनेचे खासदार आणि आमदार देणार पूरग्रस्तांना एका महिन्याचा पगार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भीषण पूर परिस्थितीमुळे जनजीवन उद्ध्वस्त झालेल्या केरळला मदत करण्यासाठी संपूर्ण देश पुढे सरसावला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक राज्यांनी आपापल्यापरीने केरळमधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय, पिण्याचे पाणी आणि खाण्याचे पदार्थांची रसद केरळमध्ये पाठवण्यात आली होती. देशातील नागरिक उत्स्फुर्तपणे मदत करत असताना आता राजकारण्यांनीही यामध्ये वैयक्तिकरित्या पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. नुकताच शिवसेने पक्षाकडून यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिवसेनेचे खासदार व आमदार त्यांचा एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. 

 

तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांसाठी तातडीची २० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा ही प्राधान्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्न पुरवठा करण्याची व्यवस्था केली होती.

केरळमधील पावसाचा जोर आता ओसरला असली तरी पुरामुळे येथील मालमत्तेचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तब्बल नऊ लाख लोकांना मदत छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने आता सरकारने सार्वजनिक सुविधा पूर्ववत करण्यावर लक्ष केंद्रित ठरवले आहे. तसेच पुरानंतर पाणी आणि हवेतून साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची सरकार कसोशीने काळजी घेत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत