शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

शिवसेनेनं गमावला परळ ब्रँड वाघ... माजी खासदार मोहन रावले यांचं निधन | News  - News18 Lokmat, Today's Latest Marathi News

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार मोहन रावले याचं निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला आहे. काही कामासाठी मोहन रावले गोव्यामध्ये गेले होते. तिथेच त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला. मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज आणलं जाणार आहे. रावले भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मोहन रावले यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. सर्वसामान्याचे नेते आणि परळ ब्रँड अशी त्यांची ओळख होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत