शिवसेनेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमी दुय्यम वागणूक-गजानन कीर्तीकर

मुंबई – रायगड माझा वृत्त

शिवसेना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असली तरी शिवसेनेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. मोदींना सभागृहात नमस्कार केल्यावर ते आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आम्ही सध्या त्यांच्या सोबत असलो तरी शिवसेना यापुढे हा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार आणि पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी मोदींवर टीका केली.

Image result for गजानन कीर्तिकर

कीर्तीकर यांची आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. केवळ शिवसेनेलाच मोदींच्या एककल्ली कारभाराचा अनुभव नाही. अकाली दल, तेलगू देशम या सरकारमधील प्रादेशिक पक्षांनाही आला आणि म्हणूनच सरकारबाहेर तेलगू देशम पडले. प्रादेशिक पक्ष दुय्यम वागणूक सहन होत नसल्याने भाजपपासून वेगळे होत असल्यामुळे भाजपसाठी २०१९ ची निवडणूक कठीण आहे. मोदी लाट केव्हाच संपली आहे. मातोश्रीवर येऊन बरोबर राहण्याची भाषा भाजपचे अध्यक्ष अमित शहा करीत असले तरी शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही कीर्तीकर यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत