शिवसेनेच्या मंत्र्यांवर बच्चू कडू यांची टीका

पुणे: रायगड माझा वृत्त 

बच्चू कडू एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना शिवसेनेकडून विमा कंपन्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी विचारले असता, त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका केली.

‘पीक विमा योजनेत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. मात्र, हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात आला, त्या वेळी शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का,’ असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी रविवारी उपस्थित केला. त्याच्या आधारे विमा देणे गरजेचे आहे. चार-पाच वर्षांपासून दुष्काळ होत आहे. त्यामुळे उत्पदनात घसरण झाली. त्याचा विमा कंपन्यांना फायदा होत आहे,’ असे कडू यांनी नमूद केले.  तसेच, विमा कंपन्या नफा कमाविण्यासाठीच आल्या आहेत. त्यांच्या नफ्यात कोण कोण वाटेकरी आहे, हे तपासले पाहिजे, असेही कडू म्हणाले. ‘पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न ग्राह्य धरले जाते. त्यातही मोठी गफलत आहे. एखाद्या तालुक्याचे, गावाचे सरासरी उत्पन्न पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निश्चित करते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत