शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला शिशिर शिंदे यांनी फेटाळून लावले

मुंबई : रायगड माझा

मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे यांनी शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला फेटाळून लावले आहे.

ते या चर्चेबाबत बोलताना म्हणाले, की शनिवारी उद्धव ठाकरे यांची अचानक भेट झाली. शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला, उद्धव ठाकरे त्याला उपस्थित होते, त्यावेळी माझी त्यांची भेट झाली. उद्धव ठाकरेंसोबत झालेली ही भेट अचानक झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मनसेच्या सर्व पदांचा शिशिर शिंदे यांनी राजानामा दिला आहे. ते आता मनसेत कुठल्याच पदावर कार्यरत नाहीत. शिशिर शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणूक २०१७ च्या निकालानंतर मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शिशिर शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात चर्चा सुरू झाली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत