शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती

मुंबई : रायगड माझा वृत्त

शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेसंबंधीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अधिकृतरीत्या पत्र देऊन याबद्द्ल सांगितलं आहे. म्हणजे आता राज्यसभा आणि लोकसभेत शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते संजय राऊतच असणार आहेत.

सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावेळेस झालेल्या व्हीपच्या घोळानंतर दोन्ही सभागृहातील खासदारांमध्ये समनव्य साधण्यासाठी पक्षानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न हाणून पडण्यासाठीही दोन्ही सभागृहाच्या खासदारांवर संजय राऊत यांची नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

‘आनंदराव अडसूल लोकसभेतील शिवसेनेच्या 18 सदस्यीय पक्षाचे नेते आहेत आणि संजय राऊत राज्यसभेतील पक्षाच्या तीन सदसीय दलाचे नेते आहेत’ असं लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात लिहण्यात आलं आहे.

उद्धव यांनी सांगितले की, राज्यसभेचे खासदार संजय राऊत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यामुळे इथून पुढे होणारा कारभार हा या निर्णयावरून व्हावा अशी विनंती करत 29 ऑगस्ट रोजी लोकसभा अध्यक्षांना हे पत्र दिलं होतं.

यापूर्वी, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेच्या स्वतंत्र संसदीय पक्षाचे नेते होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दोन सदस्यांचा समावेश असलेल्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून नियुक्त केलंय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत