शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी

नाशिक : रायगड माझा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेसाठी निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी 21 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहाणे उमेदवारी अर्ज दाखल करतील.

विशेष म्हणजे शिवाजी सहाणे यांनी गेल्या निवडणूक ज्यांच्याविरोधात लढवली होती, आता त्याच पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. सहाणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती, त्यामुळे त्यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली. सहाणे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे. सहा जागांवर 50-50 फॉर्म्युला ठरला असून नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीत या तीन जागी शिवसेना, तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन जागांवर भाजप लढणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत