शिवसेनेने महाआघाडीत सामील व्हावे – आव्हाड

Jitendra-Awhad

मुंबई : रायगड माझा वृत्त 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि कट्टर शिवसेनाविरोधक अशी प्रतिमा असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आज “मातोश्री’वर जात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे-आव्हाड यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिवसेनेने महाआघाडीत सामील व्हावे, असे आवाहन मी उद्धव यांना केल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी “मातोश्री’ वर गेल्याचे त्यांनी अगोदर सांगितले होते. ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता अत्यंत आनंदाने त्यांनी भेटण्यास या असे निमंत्रण दिले. त्यामुळे “मातोश्री’वर गेल्याचे आव्हाड म्हणाले. या वेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर राजकीय चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या भेटीचे फलित काय असे विचारले असता आगामी चार दिवसांत काय ते कळेल असे सांगत सावधगिरी बाळगली. जितेंद्र आव्हाड हे पुस्तक भेट देण्यासाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र आव्हाड यांनी “मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणे ही राजकीय समीकरणांची नवी नांदी असल्याची चर्चा सुरू आहे.

भाजपविरोधात शिवसेने दंड थोपटले असून, आता प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आव्हाड यांनाही शिवसेनेबाबत सहानुभूती व आपुलकी वाटत असल्याचे या भेटीवरून स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत