शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये

नाशिक : रायगड माझा 

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दिंडोरी नगरपंचायत समितीचे नगराध्यक्षांसह 5 नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्यासह नगरसेवक सर्वश्री तुषार वाघमारे, निलेश गायकवाड, निर्मलाताई जाधव, सविता देशमुख, सरीताताई पगारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे नगरपंचायतीची सत्ता भाजपकडे गेली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत