शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

पुणे :रायगड माझा 

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख विनायक निम्हण शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचं कळतंय. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

मूळचे शिवसैनिक असलेले निम्हण नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले होते. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते सेनेत सक्रीय नव्हते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांची प्राथमिक चर्चा झाल्याचं कळतंय. लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं कळतंय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत