शिवसैनिकांच्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका सौम्य  

महाराष्ट्र News 24 वृत्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याबाबत केलेल्या विधानाविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या वडाळा येथील एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या प्रकरणावरून शिवसेनेचे समर्थन केले नसले तरी राष्ट्रवादीची भाषा काहीशी सौम्य झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोशल मीडियातून टीका करणाऱ्या हिरामण तिवारी या युवकाला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. शिवसैनिकांच्या या कृत्याला सर्व स्तरातून विरोध होत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले की, कुणीही कुणाला मारहाण करणे योग्य नाही आणि त्याचे समर्थनही कुणी करणार नाही. परंतु, सोशल मीडियावर कोणत्या स्तरावर जाऊन ट्रोल करायचं, याबाबत सर्वांनी मर्यादा राखल्या पाहिजेत. अलिकडे महाराष्ट्रात एखाद्याला टार्गेट करून ट्रोल करण्याचे प्रकार वाढले आहेत. हीन स्तरावरिल भाषा वापरून मतं व्यक्त केली जातात, हे कुठे तरी थांबलं पाहिजे, असे मत पाटील यांनी मांडले. सत्तेसाठी भूमिका बदलणाऱ्या राष्ट्रवादीचे हे मवाळ धोरण पुढील काळात पक्षाला अडचणीत आणेल हे मात्र नक्की.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत