शिवसैनिक सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू; निकटवर्तीयांनी व्यक्त केला संशय

suresh-kalgude

महाड : रायगड माझा वृत्त

रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सूर्यकांत उर्फ सुरेश कालगुडे (51, रा. वाळण) यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री दोनच्या सुमारास महाड औद्योगिक वसाहतीतील झुआरी फर्टिलायझर कंपनीच्या आवारात घडली. मात्र त्यांचा अपगाती मृत्यू की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा अधिक तपास महाड औद्योगिक वसाहत पोलीस करीत आहेत.

कालगुडे यांचे शव बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना पसरली असून तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी झुआरी कंपनीबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत