शेअर बाजाराची घसरण सुरूच; सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for sensex

शेअर बाजारासाठी आजचा दिवस सुद्धा धक्कादायक ठरला. शुक्रवारी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरलेल्या शेअर बाजारात आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची तर निफ्टीत १५० अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली आहे.

आज शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये ४४८.५ अंकांची घसरण होऊन बाजार ३६ हजार ३९२ अंकांवर तर निफ्टी १३७ अंकांच्या घसरणीसह ११ हजार ५ अंकांवर स्थिरावला आहे. बँकिंग क्षेत्रामधील अॅक्सिक बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक बँकच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच कोल इंडिया, एनटीपीसी, टाटा स्टील, सन फार्मा, रिलायन्स, भारती एअरटेल, टीसीएसचे शेअरर्सही स्थिर नाहीत. आगामी ८ ते १० दिवसांत शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतील, असे जाणकारांनी सांगितले आहे.

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची सतत होणारी घसरण हे या घसरणीमागचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल ११२७ अंकांनी कोसळला होता. गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली होती मात्र काही मिनिटांतच निर्देशांक सावरला व दिवसभराच्या सत्रात ही घसरण २७९ अंकांपर्यंत रोखली गेली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत