शेअर बाजारातील घसरण थांबली; बाजार तेजीत बंद!

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

शेअर बाजारातील घसरण सोमवारी थांबली असून बाजार तेजीत बंद झाला आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. गेल्या काही दिवसापासून बाजारात मंदी होती. तसेच बाजार घसरणीने बंद होत होता. सोमवारी बाजार तेजीत बंद झाल्याने सकारात्मक संकेत मिळत आहेत. मुंबई शेअर बाजार सोमवारी 31 शेअरमध्ये 97.39 अंकाची वाढ घेऊन 34,474.38 वर बंद झाला.तर निफ्टी 50 शेअरमध्ये 31.60 अंकाची वाढ घेऊन 10,348 अंकावर बंद झाला.

सोमवारी बाजराची सुरुवात घसरणीनेच झाली. निफ्टीमध्ये 289.1 अंकाच्या घसरणीने 10,310 वर उघडला. तर मुंबई बाजार 35.37 अंकाची तेजी घेऊन सुरू झाला. मात्र काहीवेळाने याबाजारातही घसरणीला सुरुवात झाली. सकाळी काहीतास 23 शेअरमध्ये घसरण झाली होती. त्यावरून गुतंवणूकदारांचा कल लक्षात आला. मात्र, त्यावेळी 8 शेअर तेजीत होते. निफ्टीतही 39 शेअरमध्ये घसरण झाली असून 11 शेअर तेजीत होते.

वेदांता,टाटा स्टील, अडानी पोर्ट्स, एचडीएफसी, विप्रो आणि रिलायन्स या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. तसेच हिंडाल्को, जील, आइशर मोटर्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअरही घसरले. यस बँक, कोल इंडिया, ओएनजीसी, एसबीआई, पावर ग्रिड आणि कोटक महिंद्रा बैंकच्या शेअरमध्ये तेजी दिसली. निफ्टीमध्ये यस बैंक, हिंदुस्तान पेट्रोलियम, गेल, कोटक महिंद्रा बँक, कोल इंडिया या शेअरमध्ये तेजी आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत