शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांना अटक…

नवी मुंबई:पनवेल तालुक्यातील अनधिकृत बांधकामाविरोधात सिडकोने गेल्या आठ दिवसापासून कारवाईला सुरूवात केली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, ही कारवाई सिडकोकडून केली जात आहे. शुक्रवारी दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता या कारवाईला शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल महानगर पालिकेच्‍या सर्व नगरसेवकांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी सर्वांना अटक केली. पनवेल तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने कळंबोली पोलिस स्टेशनला एकत्र यायचे आव्हान यावेळी शेकापकडून करण्यात आले.

या कारवाईमध्ये ग्रामस्थांनी बांधलेली घरे, काळभैरव मंदिरासमोरील सभा मंडप तसेच गणेश विसर्जन घाट (तलाव) हटवण्‍यात येणार आहेत. सायन पनवेल हायवे ते कळंबोली गाव जोड रस्ता बंद करून त्या जागेवर फाईव्‍ह स्टार हॉटेल उभारणार आहेत. या कारवाईला विरोध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत