शेकापचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

चिरनेर : रायगड माझा वृत्त

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कासप विभागातील शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उरण-पनवेल-खालापूरचे कार्यसम्राट आमदार मनोहरशेठ भोईर यांची वाढती लोकप्रियता तसेच कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कासप विभागातील शेकापक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार मनोहर भोईर यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.

कासप विभाग हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी शिवसेनेने त्या विभागात जोरदार मुसंडी मारून शेकापचा बालेकिल्ला उध्वस्त केला आहे.पक्ष प्रवेशा मध्ये वासुदेव धर्मा ठोंबरे, राम मारुती कोंडीलकर, अनंता कृष्ण कोंडीलकर, दत्तात्रेय नामदेव गाताडे, नामदेव पांडुरंग पाटील, संजय गायकवाड, संतोष बुधाजी चोरगे या महत्त्वाच्या कार्यकर्त्याचा समावेश आहे. याप्रसंगी संतोष पातळ शाखाप्रमुख कासप, अरुण पांडुरंग पाटील, नितेश नाथा कारांदे शाखाप्रमुख कराडे खुर्द, कैलास दत्तात्रेय पवार चावडोली, सुशांत महाडिक कराडे खुर्द, प्रशांत चितले शाखाप्रमुख चावडोली, निरीक्षक कृष्णा घरत उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत