शेकापतर्फे भ्याड हल्ल्याचा निषेध व शहीद जवानांना श्रद्धांजली

पनवेल : नितीन देशमुख

पनवेल शेतकरी कामगार पक्ष व पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यातर्फे जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, पनवेल येथे १५ फेब्रुवारी २०१९ रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पनवेलकर  शहीदाना “श्रध्दांजली ” वाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला व शहीद झालेल्या जवानांना स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार बाळाराम पाटील,  जिल्हा चिटणीस गणेश कडू, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवदास कांबळे, प्रभाकर कांबळे,  सारिका भगत, प्रीती जॉर्ज म्हात्रे, माधुरी गोसावी डॉ. सुरेखा मोहोकर, अरविंद म्हात्रे, आदि नगरसेवक तसेच रोहन गावंड, अविनाश माकस, आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत