शेतकरी आत्महत्या सुरूच; मराठवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

येथील शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी (ता.21) सकाळी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव गणेश लक्ष्मण तायडे (वय 40) असे आहे. गणेश तायडे यांना तीन एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर होता. ते सकाळी 4 वाजता घरातून शेतात गेले होते. गावातील काही लोक शेतात जात असताना ते झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ खाली उतरवले व घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना देण्यात आली‌.

बिट जमादार सुरेश दौड घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना वडोद बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत