शेतकरी शेतात तर त्यांची मुले सीमेवर बलिदान देतात- शेट्टी

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापुरात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी शेतकरी शेतात तर त्यांच्या मुले सीमेवर आपले बलिदान देत आहेत. सगळ्यांनी पाठिंबा देवूनही सरकार पाकिस्तानवर कारवाई का करत नाही? असा सवाल केला.

पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला झालेल्या भ्याड दहशतवादी ह्ल्ल्यात भारतमातेने ४० सुपुत्र गमावले. या पार्श्वभूमीवर एका समारंभात राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले, एकीकडे शिवारामध्ये शेतकरी अडचणीत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांची मुले सीमेवर देशासाठी बलिदान देत आहेत. याचे सरकारला काहीच वाटत नाही. असे वक्तव्य करत ५६ इंच छाती अशी गर्जना करणारे कुठे गेले? असा सवाल केला. तसेच ते म्हणाले, संपूर्ण देश सरकारला पाठिंबा देत असताना सरकार पाकिस्तानवर कारवाई का करत नाही अशीही विचरणा केली.

महाआघाडी संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, महाआघाडीतील जागा वाटपासंदर्भातील निर्णय अद्यापही आम्हाला कळविण्यात आलेले नाही. केवळ आमची बोळवण करतात. समाधानकारक निर्णय आल्याशिवाय महाआघाडीत जाण्याचा प्रश्न येत नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत