शेतकऱ्यांना माल ऑनलाईन विकता येणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शेतकऱ्यांना आपला माल आठवडा बाजारच्या माध्यमातून थेट ग्राहकाला विकण्याची परवानगी मिळाली. याचेच पुढचे पाऊल म्हणून शेतकऱ्याला आता आपला माल ऑनलाइन विकता येणार आहे. यासाठीचे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. ‘ई-नाम’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकाला विकता येणार असून स्वतःच्या मालाचा दरही ठरवता येणार आहे.

केंद्र सरकारने ऑनलाइन मार्केटिंग साइटस्च्या धर्तीवर ऑनलाइन नॅशनल ऑग्रिकल्चर मार्केट या योजनेला मंजुरी दिली. केंद्राच्या या योजनेनुसार राज्य सरकारने विधेयक आणून ही योजना राज्यात राबविण्याचा मार्ग खुला केला आहे. यासंदर्भात 25 ऑक्टोबर रोजीच राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. राज्यातील 60 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ही ‘ई-नाम’ योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे ‘एपीएमसी’मधील ‘ऑनलाइन’वरील ऑर्डरनुसार ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. ऑनलाइन विक्रीमुळे शेतकऱ्यांची दलालांच्या जाचातून मुक्तता होणार आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची किंमत स्वतःच ठरवता येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला ज्या बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळेल तिथे तो शेतमालाची विक्रीही करू शकणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत