शेतकऱ्यांनो, टोकाची भूमिका घ्या: शरद पवार

मुंबई: रायगड माझा 

शेतकरी म्हणून माझा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. समाजाने शेतकरी संपाला पाठिंबा द्यावा. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तशी त्यांची नियत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते मुंबईत बोलत होते. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध न ओतण्याचेही आवाहन केले.

“माझी विनंती आहे, आंदोलनात रस्त्यावर दूध ओतणं टाळावे. आक्रोश दाखवायचा असेल तर दूध गरीब मोहल्ल्यात वाटप करा. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही. त्याउलट गरिबांची सहानभूती मिळेल”, असे पवार म्हणाले. “सामान्य माणसाला त्रास होईल, लोकांवर आघात होईल असं काही करु नये. पण हा संघर्ष प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, हा निकाल घ्यावा लागेल.  सरकारने दिलेली आश्वासन पाळली नाहीत,तशी त्यांची नियत दिसत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी असे आवाहन करतो”, असे पवारांनी नमूद केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत