शेलू येथे विजेचा धक्का लागून चार बोकडांचा मृत्यू,महावितरणचा गलथान कारभार

नेरळ : अजय गायकवाड 

मध्य रेल्वेचे स्थानक असलेल्या शेलू गावात महावितरण कंपनीच्या दुर्लक्ष पणामुळे चार बोकडांचा नाहक बळी गेला आहे.
शंकर चंद्रकांत मसणे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान महावितरण कंपनीमुळे झाले आहे.तर लहान मुलाला  विजेचा धक्का लागल्याने मनुष्य  जीवित हानि होता होता राहिली, दरम्यान शेलू गावातील सर्व विजेच्या सर्व खांबांना शॉक लागत असून तात्काळ कार्यवाही न केल्यास पावसाळ्यात मोठा हाहाकार माजण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेलू गावातील शंकर हे शेतकरी  बोकड,बकऱ्या  दररोज उल्हास नदीच्या परिसरात  चरायला घेऊन जातात.नेहमीप्रमाणे आज   शंकर मसणे हे सकाळी साडेनऊ वाजता बोकड घेऊन घरातून बाहेर पडले.त्यावेळी शेलू गावात पाऊस कोसळत होता,त्यात बोकड हे तेथील विजेच्या खांबांना चिकटून जात असताना त्या खांबातून वाहणाऱ्या विज वाहत होती.त्या धक्क्याने तब्बल चार बोकड हे जागच्या जागी तडफडत पडले.तर लहान मुलांला दुसऱ्या ठिकाणी असलेल्या खांबाला  हात लागताच त्याला जोरदार झटका दिल्याने तो बाजूला फेकला गेल्याने मनुष्य जीवित हानी टळली .या घटनेने शंकर मसणे यांचे किमान 60 हजाराचे नुकसान झाले  आहे.
या बाबत स्थानिक रहिवासी  यांनी महावितरण कंपनीला जबाबदार धरले आहे.गावात उभे करण्यात आलेले लोखंडी खांब अनेक ठिकाणी पायाला सडले आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील जुने खांब बदलण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी  विजेचे खांब बदलण्याची केली होती ,पण या संदर्भात महाराष्ट्र वितरण कार्यवाही करताना दिसत नाही.आज झालेल्या दुर्घटने मध्ये शेतकरी शंकर मसणे याना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी उपसरपंच गुरुनाथ मसणे यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत