शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने घर आणि रोख रक्कम पाच लाखाची राख रांगोळी

कर्जत :भूषण प्रधान

कर्जत नगरपरिषद हद्दीतील सेवालाल नगर येथे मंगळवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने घर आगीत भस्मसात होऊन घरातील एका पत्र्याच्या पेटीतील पाच लाख रुपयांची रोख रक्कम आगीत जळून खाक झाली आहे.

कर्जत मुरबाड रस्त्यालगत सेवालाल नगर असुन तेथे अनिल चंदर राठोड यांचे स्वतःचे घर आहे.  पाच दिवसांपूर्वी अनिल राठोड व त्यांच्या पत्नी कर्नाटक येथे गेलेले आहेत. फक्त त्यांची मुलगी घरी होती. मंगळवारी  मुलगी घराला लॉक करून बाहेर गेली होती. त्याच दरम्यान घरामध्ये शॉर्ट सर्किट झाले व घरातून आगीचे लोळ बाहेर आले. शेजारी राहणाऱ्या  सीताबाई सुधाकर चव्हाण यांच्या आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी मदती साठी आरडाओरडा केला.  अग्निशमन दलाची गाडी हि घटनास्थळी पोहचली व आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत घरातील सर्वकाही आगीत जळून खाक झाले होतं .घरातील सामान बाहेर काढताच पत्र्याच्या पेटीतुन धूर निघताना दिसून आला.  बघतात तर काय त्यात असलेली 5 लाख रोख रक्कम जळून राख झाली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत