श्रमजीवी फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप

म्हसळा : निकेश कोकचा 

१ जुलै २०१८ रोजी म्हसळा तालुका  चिखलप केंद्रातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलप आदिवासी येथे श्रमजीवी फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हा अर्थ व नियोजन​समिती सदस्य, कुशल नेतृत्व श्री . बबन मनवे , श्रमजीवी फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री हरेश जी कावणकर , श्रमजीवी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश शिगवण , आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री मंगेश जी मुंडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री म्हशिलकर , कुणबी युवक म्हसळा तालुका सरचिटणीस सतिश शिगवण, पुढारी वृत्तपत्रांचे पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, श्रमजीवी रायगड जिल्हा समन्वयक जयसिंग बेटकर, शिक्षण प्रेमी शैलेश दिवेकर शाळेचे मुख्याध्यापक दिलिप. शिंदे, प्राथमिक शिक्षक राहुल नाईक सर,  शाळा कमेटी अध्यक्ष लाल्या जाधव , शाळेचे पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि श्रमजीवी राज्यस्तरीय पुरस्कार विजेते मान्यवर आदी उपस्थित होते.  यावेळी शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करून केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जयसिंग बेटकर सर यांनी केले श्रमजीवी संस्थेची पार्श्वभूमी सांगितली . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कावणकर साहेब यांनी आपल्या मनोगतात या फाउंडेशनचे कार्य दापोली तालुक्यात आम्ही सुरुवात केली आणि या संस्थेच कार्य एका छोट्याशा रोपट्या प्रमाणे सुरवात करून वटवृक्षात रूपांतर झाले यांचे सर्व क्षेय संपूर्ण श्रमजीवी परिवाराचे आहे आम्हाला म्हसळा तालुका मध्ये येऊन आज शाळेत येऊन विद्यार्थ्यांजवळ संवाद साधता आला त्याबद्दल खूप आनंद व्यक्त केला.
जिल्हा परिषद सदस्य मनवे साहेब यांनी  सांगितले की, आम्ही गेले पाच, सहा वर्षे श्रमजीवी संस्थेच्या सामाजिक कार्याची वाटचाल ऐकत आहोत संपूर्ण कोकणात चांगले कार्य चालू आहे तसेच मुंबई मध्ये सुद्धा विविध उपक्रम राबविले जातात आणि या फाउंडेशनचे चांगले उल्लेखनीय कार्य चालू आहे आपण आमच्या म्हसळा तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल फाउंडेशनचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी​ सतिश शिगवण, मंगेश मुंडे यांनी श्रमजीवी फाउंडेशनचे कौतुक केले . शाळा कमेटी अध्यक्ष जाधव यांनी सांगितले की आमच्या दुर्गम भागातील मुलांना वह्या, पेन व ईतर साहित्य देऊन प्रोत्साहन केल्याबद्दल संस्थेला धन्यवाद दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री दिलीप शिंदे यांनी केले .आणि आभार प्रदर्शन श्री राहुल नाईक सर यांनी केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत