श्रीगोंदा येथे रेल्वे रुळांचं नुकसान; रेल्वे वाहतूक गुरुवारी मध्यरात्री होणार पूर्ववत

अहमदनगर : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

Rail traffic will resume at midnight on Thursday | रेल्वे वाहतूक गुरुवारी मध्यरात्री होणार पूर्ववत

बुधवारी पहाटे श्रीगोंदा येथून तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून मनमाड कडे जाणाऱ्या मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. मात्र कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. त्यामुळे दौड मनमाड लोहमार्गावरील सर्व वाहतुक ठप्प झाली आहे. परंतु रेल्वे रुळांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक, दुरुस्तीचे काम पुर्ण होई पर्यंत बंद राहणार आहे. रेल्वेचे सोलापूर विभागाचे शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आपत्ती व्यवस्थापन टीमने लोहमार्ग दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे गुरूवारी मध्यरात्री वाहतुक पुर्ववत सुरू होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत