श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

संग्रहित छायाचित्र

आज देशात संविधान दिन साजरा केला जात आहे. तर मुंबईतील दहशतवाद्यांच्या हल्ल्याला देखील आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशात आता श्रीनगर परिसरात पुन्हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे २ जवान शहीद झाल्याची माहिती आहे.

श्रीनगरमधील एचएमटी परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सध्या या परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे. या हल्ल्यात २ जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत