श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार!

कर्जत : रायगड माझा वृत्त 

१६ व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग, संसदेमधील उपस्थीती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

चेन्नई येथील आयआयटी आणि प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रथमच निवडून गेलेल्या खासदारांमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेमध्ये केलेल्या कामकाजाबद्दल जाहीर झाला आहे. हा  पुरस्कार ९ जून २०१८  रोजी चेन्नई  येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिला जाणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रिय मंत्री अर्जुन राम मेघवाल, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार एम.के. नारायनान यांच्यासह  माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती आणि  डायरेक्टर इन्डीयन इन्स्टीट्युट टेक्नॉलॉजी मद्रासचे डॉ. भास्कर राममुर्ती यांच्या हस्ते ‘संसदरत्न’ पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.

 १६ व्या लोकसभेच्या गेल्या चार  वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ९३५ प्रश्न उपस्थित केले, २५५  वेळा प्रत्यक्ष चर्चेतील सहभाग घेतला, ९५ % उपस्थिती दर्शविली. १६  खाजगी विधेयके मांडले, माथेरान मिनी ट्रेन त्याचबरोबर विविध समितींच्या बैठकीमध्ये सर्वाधिक उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा सर्वाधिक वापर करून विविध विकासकामे पूर्णत्वास आणली. या कामगिरीबद्दल खासदार बारणे यांची सलग चौथ्या वर्षी या पुरस्कारासाठी निवड झाली आहे .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत