श्रीलंकन महिलेचा शबरीमाला मंदिरात प्रवेश

नवी दिल्‍ली : रायगड माझा ऑनलाईन

शेकडो वर्षाची परंपरा खंडीत करत बुधवारी दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रदेश केला. या दोन महिलांच्या प्रवेशानंतर गुरुवारी (ता.३) संध्याकाळी ४६ वर्षीय श्रीलंकन महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करुन भगवान अयप्पांचे दर्शन घेतले. शशीकला असे या महिलेचे नाव असून, केरळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला. या महिलेने रितसर कागदपत्रांची पुर्तता करुन गुरुवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता दर्शने घेतले. त्‍यानंतर रात्री ११ वाजता ती महिला मंदिर परिसरातून सुखरुप परतल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

शशीकला यांनी गाभाऱ्यात प्रवेश करुन भगवान अयप्पा स्‍वामी यांच्या समोरील ‘त्‍या’ पवित्र १८ पायऱ्या चढून कोणत्‍याही अडथळ्याविना दर्शन घेतले. शशीकला यांनी शबरीमाला मंदिर प्रवेशासाठी ॲडव्हान्स बुकिंग केले होते.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शशीकला आणि तिच्या नातेवाईकांनी मंदिरात प्रवेश करण्याबाबत माहिती पोलिसांना दिली. शशीकला यांनी आपल्‍या वयाबाबतची कागदपत्रे पोलिसांकडे जमा केली होती. शशीकला यांच्या पासपोर्टवरील माहितीवरुन त्यांचा जन्म १९७२ मध्ये झाल्‍याचे पोलिसांनी सांगितले. शशीकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना साध्या वेशातील पोलिस संरक्षण देण्यात आले असे पोलिसांनी स्पष्ट केले.

शबरीमला मंदिरात १० ते ५० या वयोगटातील महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. मात्र, कडव्या हिंदू संघटनांच्या विरोधामुळे याची अंमलबजावणी करता येत नव्हती. हिंदुत्ववादी संघटनांच्या धमक्यांना न जुमानता २ जानेवारी रोजी बिंदू आणि कनकदुर्गा नावाच्या दोन महिलांनी पोलिस संरक्षणात शबरीमला मंदिरात प्रवेश करुन भगवान अयप्पांचे दर्शन घेतले होते. या ऐतिहासिक घटनेनंतर गुरुवारी केरळमध्ये बंदची हाक देण्यात आली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत