श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक मुलीचा विनयभंग

विनयभंग करणारा आरोपी सचिन येलवे (चिन्या) यास पोलिसांनी घेतलं ताब्यात आणखी तीन साथीदारांच्या तपास सुरू

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

मुंबई येथील पर्यटक प्रतीक हसबे व सोबत त्यांचे मित्र मैत्रिणी असे पाच जण श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी आलेले असताना श्रीवर्धन समुद्र किनारी एका रिसॉर्टमध्ये वस्थीस होते. यावेळी प्रतीक हसबे यांचे श्रीवर्धन येथील मित्र आरोपी सचिन येलवे वय ४१ यांनी रिसॉर्ट येथे येऊन वीस वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद मुलीने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार आरोपी सचिन येलवे यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्र मंडळींसोबत रात्री जेवण करून डान्स करत असताना फिर्यादी वीस वर्षीय मुलीला पाठीमागून मिठी मारून गालावर चुंबन घेऊन तिच्याजवळ अश्लील चाळे करून त्यानंतर रात्रीच्या सुमारास फिर्यादी यांनी बुक केलेल्या रिसॉर्टच्या टेन्ट मध्ये फिर्यादी झोपेत असताना रात्री २:३० वा घुसून पहाटे पर्यंत त्यांच्या शेजारी पडून त्यांच्याशी अश्लील चाळे करून फिर्यादी हिचे मानस लज्जा उत्पन्न केली. त्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी यांचे  तीन साथीदार यांच्यासह फिर्यादी याना त्याचे सोबत लग्न करण्याकरिता जबरदस्ती करून दमदाटी केली म्हणून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा र क्र २०/२०१८ भा दं वि कलम ३५४, ४५२, ५०६, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर करत आहेत. आरोपी सचिन येलवे याना पोलिसांनी ताब्यात घेतली असून आरोपी यांचे तीन साथीदार यांचा तपास पोलीस करत आहेत. श्रीवर्धनमध्ये आसा प्रथमच प्रकार घडल्यामुळे श्रीवर्धमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या आरोपी विरुद्ध व त्यांच्या साथीदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रीवर्धनमधून जोर धरत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत